Surya Ghar Yojana : पोस्टमन देणार ‘सूर्यघर’
केंद्र सरकारचे पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना घरोघरी पोचविण्यासाठी पोस्ट खात्याची निवड झाली आहे. पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. त्यासाठी पीएम सूर्यघर नावाचे अॅप तयार केले आहे. लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्यधर मोफत वीज योजनेची घोषणा केली आहे. देशभरात एक कोटी घरांमध्ये ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. घराच्या छतावर सौर उर्जा वीजनिर्मिती संच बसवून वीज निर्मिती केली जाणार आहे. ही वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, असे या योजनेचे स्वरूप आहे.
एक किलोवॅटसाठी आठ ते १० चौरस मीटर क्षेत्र
घराला लागणाऱ्या गरजेएवढी वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते.
अतिरिक्त वीज महावितरण
विकत घेणार आहे. कुटुंबाला दोन किलोवॅटपर्यंत प्रत्येक किलोवॅटला ३० हजारांचे तर अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेची
यंत्रणा बसविणाऱ्या कुटुंबाला एका किलोवॅटला १८ हजारांचे असे जास्तीत जास्त ७८ हजारांचे अनुदान दिले जाणार आहे.
घरोघरी लाभार्थ्यांची सर्वेक्षण नोंदणी होणार
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा