काळजी घ्या! राज्यात उन्हाचा तडाखा वाढणार, आज जळगावात उष्णतेची लाट ४४.६ अंशांवर पोहोचली. राज्यातील हे या वर्षातील सर्वोच्च तापमान आहे.
आज राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज महाराष्ट्रात उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
त्यामुळे कमाल तापमानातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 42 ते 45 अंश सेल्सिअस, पुण्यात 40 अंश सेल्सिअस आणि मुंबईत 36 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा पोहोचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 8:24 am