successful parenting Tips : यशस्वी पालकत्वाचा मंत्र! मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही सोनेरी सूचना

successful parenting Tips : यशस्वी पालकत्वाचा मंत्र! मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही सोनेरी सूचनाआपल्या पाल्याला वेळ द्या : आई-वडील दोघेही नोकरीला असले तरी घरी थोडा वेळ आपल्या मुलासोबत घालवावा. शक्य असल्यास सर्वांनी जेवण एकत्र घ्यावे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यात आई-वडिलांनी कमी वेळ घालवावा म्हणजे त्यांना आपल्या पाल्याशी संवाद साधता येईल.

सकाळी लवकर उठणे, थोडा व्यायाम स्वत: करणे व आपल्या पाल्यासदेखील थोडासा व्यायाम करायला लावणे. सूर्यनमस्कार हा सर्वांत उत्तम व्यायाम प्रकार आहे. नियमित केल्यास याचे फायदे आयुष्यभर मिळतात.

सूर्यनमस्कार करण्याचे वय आठ वर्षे ते ८० वर्षे आहे. आपल्या शिक्षकांमार्फत सूर्यनमस्कार व्यवस्थित शिकून घेणे.

२) कुठलीही अपेक्षा न बाळगता आपल्या मुलावर प्रेम करा. प्रत्येक मुल हुशार असतेच असे नाही. काहींचा कल खेळाकडे व कलेकडे असतो. अशा मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची मुभा द्यावी. त्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे. खेळाचे चांगले मार्गदर्शक उपलब्ध असतील, तर त्यांचा अवश्य लाभ घ्यावा. प्रत्येकजण सचिन तेंडुलकर होणार नाही पण आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे काय चुकीचे आहे?

३) शारीरिक खेळांकडे व मैदानी खेळांना प्रोत्साहन द्यावे : हल्लीची पिढी ही संगणक पिढी आहे. मैदानात जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. मोबाईलचा मर्यादित वापर जरुर करावा पण त्याच्या आहारी जाऊ नये.

४) गुरुजनांचा आदर : आपल्या पाल्यांना शिक्षकांचा आदर करण्यास शिकवावे. शिक्षकांवर टीका करणे, त्यांची चेष्टा करणे या गोष्टी पालकांनी टाळाव्या. आपल्या यशामध्ये गुरूंचे मार्गदर्शन व त्यांचा आशीर्वाद यांचा मोठा वाटा असतो.

५) आपल्या मुलासाठी सर्व सुखसोयी उपलब्ध करा – काही प्रमाणात त्यांचा गैरवापर होईल हे गृहीत धरुन चला.
यशस्वी पालकत्वासाठी सूचना.
>>> येथे क्लिक करा <<<

tc
x