Step By Step Baby Growth In Marathi : बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार

बाळाची वाढ आणि विकास :
प्रत्येक महिन्यात आपल्या बाळाची वाढ व विकास कसा होत असतो याची माहिती खाली दिली आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर बाळ नवनवीन कृती शिकत असते.

१ महिने :
बाळ पहिल्या महिन्यात हलणाऱ्या वस्तू किंवा खेळण्याकडे पाहते, आईला ओळखते मूठ घट्ट आवळून घेऊ शकते. मोठ्या आवाजाने दचकते.

२ महिने :
या महिन्यात बाळ नजर स्थिर ठेऊ शकते. बाळ हसते, ओळखीची माणसे पाहून हसणे. बाळाला पाठीवर झोपवले असता ते आपली मान बाजूला हलविते.

३ महिने :
बाळाला पालथे झोपविल्यास ते आपली मान व खांदे उचलते. आवाजाच्या दिशेने प्रतिसाद देते. बाळाला बोलाविल्यास आनंदाने हुकार देते, हसते.

४ महिने :
खेळणी पकडण्यासाठी हात पुढे करत असते. आवाजाकडे लक्ष दते.

५ महिने :
बाळाची मान धरते. मानेचा तोल सावरता येतो. हातावर ताबा येतो. खेळणी अधिक आवडू लागतात. यावेळी वजन हे जन्म वजनाच्या दुप्पट होते. एकसारखे आवाज काढते, ओरडते.

६ महिने :
बाळाला पालथे झोपवल्यास ते पलटी होऊ शकते. बाळाचे दात येण्यास सुरवात होते. आवाज अधिक निघू लागतात.

पुढील माहिती येथे वाचा क्लिक करा

tc
x