SSC Student Exam Rule : नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार आहे.आता विद्यार्थ्यांना सात, आठ नाही तर तब्बल 15 विषयांचा अभ्यास करावा लागणाार आहे. विषय वाढल्याने शाळांची वेळ देखील वाढण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सात ते आठ विषय होते. मात्र नव्या आरखड्यानुसार यामध्ये भर पडल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे. व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण आणि आंतरविद्याशाखा विषय बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच तीन भाषा,विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेले तीन असे दहा विषय असणार आहे. याशिवाय स्काऊट, गाईड हे देखील बंधनकारक तरण्यात आले आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल
नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल केला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचा ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करुन हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल तर दहावीला बागकाम, सुतारकाम, परिचर्या या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल. कलाशिक्षणात दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला या सर्वांची ओळख करून देण्यात येईल. या विषयाला श्रेणी देण्यात येईल. सादरीकरण, शिक्षकांचे निरिक्षण, विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यमापन, गट कामगिरी, कल्पकता याआधारे मूल्यमापन करण्यात येईल.
SSC Student Exam Rule : कोणते विषय असणार?
>>>>> येथे क्लिक करा <<<<
This post was last modified on October 19, 2024 6:44 am