SSC-HSC EXAM : १० वी आणि १२ वीच्या पेपरसाठी १० मिनिटे वाढीव वेळ…पण कधी आणि कोणाला?

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी तसेच बारावीच्या मुलांसाठी आणखीनच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या संकटानंतर या वर्षी पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे लेखी परीक्षा होणार आहे.

पण गेल्या २ – ३ वर्षात विद्यार्थ्यांचा पुर्णपणे ऑनलाईन अभ्यास झाल्यामुळे लिखाणाचा सराव मागे पडला आहे. त्यामुळेच आता बोर्डाने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन लेखी परीक्षेसाठी १० मिनिटांचा वेळ वाढून दिला आहे. त्यामुळे आता प्रत्येक विषयाला प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटं अधिकचा वेळ मिळणार आहे.


पालक संघटनेनेदेखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अधिकचा वेळ मिळावा यासाठी मागणी केली होती. त्यानुसार राज ठाकरें यांनीही आपण महाराष्ट्राच्या शिक्षण विभागापर्यंत ही मागणी पोहचवू असं म्हटलं होतं.

याचदरम्यान कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी परीक्षेच्या आधी १० मिनिटं पेपर देण्याचा बोर्डाचा नियम यंदापासून बोर्डाने रद्द केला आहे. हा अधिकचा १० मिनिटांचा वेळ हा निर्धारित वेळेच्या नंतर दिला जाणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता १२ वीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी आणि १० वीच्या परीक्षा २ मार्च पासून सुरू होणार आहेत. या परीक्षा सकाळच्या सत्रामध्ये ११ वाजता होणार आहेत तर दुपारच्या सत्रामध्ये ३ वाजता सुरू होणार आहेत.

पण विषयानुसार आता जसा पेपर असेल त्याच्या उत्तर पत्रिका सादर करण्याच्या वेळेमध्ये अधिकची १० मिनिटं त्यांना दिली जाणार आहेत.ही १० मिनिटे ठराविक वेळेनंतरदिले जाणार आहेत. या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत.

tc
x