SSC/HSC AFTER RESULT : दहावी-बारावीच्या निकालानंतर काय करावे? विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आणि करिअर निवडीचे मार्गदर्शन बारावी आणि दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना कला (बीए), वाणिज्य (बीकॉम), विज्ञान (बीएससी) शाखेशिवाय अभियांत्रिकीसह लॉ, डीएड, फार्मसी अशा विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाची संधी आहे.
SSC/HSC AFTER RESULT : बारावीनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, मेडिकल, कला (एमपीएससी, युपीएससी व्यवस्थित तयारी, अभ्यास केल्यास), जिओग्रॅफीकल सर्व्हे ऑफ इंडिया सर्वेअर म्हणून संधी मिळू शकते. नर्सिंग, पॅथॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, बायोइन्फॉरमेटिक्स, डीएड, बीएसएल, फार्मसी, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, बीएससी, बीएससी ॲग्री, बीए, बीकॉम, बीबीए, बीसीए, बीबीएम, फॉरेन लॅंग्वेज अशा अभ्यासक्रमांसाठी देखील प्रवेश घेता येईल.
SSC/HSC AFTER RESULT : विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी घ्यावी संपूर्ण माहिती
बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजची वेबसाईट पाहावी व तेथील प्रवेश प्रक्रिया पहावी, त्याठिकाणी भेट देऊन प्रवेश व अभ्यासक्रम, विषयांची माहिती घ्यावी. सध्या कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे कल जास्त असून स्वायत्त महाविद्यालयांमध्ये त्यादृष्टीने भरपूर कोर्सेस आहेत. त्या त्या महाविद्यालयांमधील विषय पाहून आवडीचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कला शाखेचा विद्यार्थी ‘विज्ञान’ व ‘वाणिज्य’चा विषय देखील घेऊ शकतो. त्याला आवडीच्या विषयाची माहिती त्यातून मिळू शकते.
SSC/HSC AFTER RESULT : महत्त्वाची काही संकेतस्थळे
>>>>येथे क्लिक करा <<<