आता द्यावी लागेल पुरवणी परीक्षा पहा
दहावीचा हिंदीचा पेपर हा 8 मार्चला होणार होता मात्र सोशल मीडियावर एक वेळापत्रक व्हायरल झालं आणि त्यात हिंदीचा पेपर 9 मार्चला आहे असं सांगण्यात आलं.
त्यामुळं राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचा हा पेपर मुकला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा हा हिंदीचा पेपर मुकला आहे अशा विद्यार्थ्यांना आता पेपर हा पुरवणी परीक्षेत द्यावा लागणार आहे.
कोणत्याही सोशल मीडियावर आलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेऊ नका, जोपर्यंत बोर्डाकडून घोषणा होत नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट खरी मानू नका असं बोर्डानं परीक्षा सुरु होण्याच्या आधीच वारंवार सांगितलं होतं.
मात्र तरीही विद्यार्थ्यांनी अशा खोट्या वेळापत्रकावर विश्वास ठेऊन परीक्षेला आले नाहीत. त्यामुळे ही बोर्डाची चूक नाही असं बोर्डाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.