दहावी बारावीनंतर काय करावे हा प्रश्न मन गोंधळून टाकतो पुढील शिक्षण काळजीपूर्वक घ्यावे लागते पुढील मार्ग काळजीपूर्वक निवडावा लागतो. कारण दहावी नंतर योग्य शिक्षण घेणे हा विद्यार्थाच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीचा पाया असतो. बऱ्याच विद्यार्थाना सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्ध आहेत. काही विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध होत नाही, शिक्षकांचे मार्गदशन योग्य प्रकारे मिळत नाहीत.
दहावी बारावीनंतर आपल्या क्षमतेनुसार , कुवतीनुसार करिअरचा मार्ग निवडावा लागतो.आणि तो योग्य निवडला नाही तर आपण आपले ध्येय गाठू शकत नाही मग दहावी व बारावी झाल्यानंतर काय करावे ?
येथे क्लिक करा :-
10 वी नंतर काय करावे | 10 वी नंतर कोणता विषय निवडावा | What to do After 10th in Marathi
काही मुलांना वाटते डॉक्टर इंजिनिअरिंग व्हावे काही मुलांना स्वतःचा व्यवहार करायला आवडते आपल्याला दहावी आणि बारावी नंतर कोणते कोर्स आहेत याची माहिती असल्यास आपण आपला मार्ग निवडू शकतो.
आपल्याला जे काही बनायचं आहे,ते अगोदर निश्चितपणे ठरवलं की मग,आपल्या स्वप्नापर्यंत आपण सहजरित्या पोहचु शकतो.
एक व्यक्ती रात्री अंधारात दुसऱ्या गावी जायला निघाला, त्याला कसे जावं ते सुचेना,एक मित्रानं त्याला कंदील दिला ,तर तो तिथेच उभा राहून म्हणू लागला हा कंदील तर माझ्या पावलापूरताच आहे,तर तो दुसरा मित्र म्हटला तू पुढे चालत राहिलास तर निश्चितच प्रकाश तुझ्यासोबतच येईल,म्हणजेच आपलं करियर निवडतांना तुम्हाला कोणत्या क्षेत्रात आवड आहे,ते तुम्हाला झेपेल का,तुमच्यात तेवढि क्षमता आहे का या प्रश्नांची उत्तरे शोधा आणि मग त्यानुसार ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा
स्वतःतील आत्मविश्वास न डगमगता कोण काय सांगेल, दुसऱ्यांन ते निवडलं म्हणून तुम्ही तस निवडू नका.स्वतःच कौशल्य विकसित करा
12 वी नंतर काय करावे | 12 वी नंतर कोणता विषय निवडावा | What After 12th in Marathi
ज्या क्षेत्रात रुची आहे कला,संगीत,business त्यात स्वतःला झोकून द्या, नव्हे चहाची टपरी,वडापाव चा गाडा, यात जर रस असेल तरीही तुम्ही स्वतः स्वतःचा मालक होऊन एक स्वतःची ओळख बनवू शकता ,ते ही एक करियर च आहे,.कामाची लाज नव्हे आवड असावी
मित्रांनो चला तर दहावी बारावीनंतर कोणकोणते कोर्स आहेत ते थोडक्यात जाणून घ्या
येथे क्लिक करा :-
10 वी नंतर काय करावे | 10 वी नंतर कोणता विषय निवडावा | What After 10th in Marathi
12 वी नंतर काय करावे | 12 वी नंतर कोणता विषय निवडावा | What After 12th in Marathi
असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला व पालकाला येत असतो.
साहजिकच आहे हा प्रश्न यायलाच पाहिजे कारण एका मुलाला आपल्या भविष्याचा विचार करावा लागतो. आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात आपली स्वप्न फक्त आपली नसतात आपल्या पालकांची स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असतात .
तसेच प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या भवितव्याचा विचार येतो आपल्या मुलाने शिक्षण घेऊन आपले नाव मोठे करावे समाजात मान सन्मान मिळावा ही स्वप्न प्रत्येक पालक आपल्या पाल्याबद्दल विचार करत असतो .
This post was last modified on %s = human-readable time difference 10:27 am