परीक्षेला जरी एकाच आठवडा राहिलाय… तरी टेन्शन को मारो गोली…
टेन्शन घेतल्याने झालेला अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. दिवसाचे नियोजन करा. प्रत्येक दोन तासांनी 15 मिनिटे ब्रेक घेऊन चेहरा थंड पाण्याने धुवा.
हे ही वाचा : – ‘ विद्यार्थ्यांनी’ परीक्षेला जाताना हि काळजी घ्या…
अंग ताणून मोकळे करा. डोळे बंद करून 5 मिनिटे दीर्घ श्वसन करा. एखादी आवळा सुपारी किंवा चॉकलेट तोंडात टाका आणि १५ मिनिटे झाले की पुन्हा लगेच अभ्यासाला बसा.
हे ही वाचा :- बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताय? मग ‘हे’ Apps करतील तुमची मदत आजच डाउनलोड करा
दिवसभरात असे नियोजन केले तर अभ्यासातले कॉन्सन्ट्रेशन वाढायला मदत होईल आणि कंटाळवाणा अभ्यास झटकन पूर्ण होईल. अस नक्की करून पहा आणि हो… सकाळच्या कोवळ्या उन्हात रोज किमान १० मिनिटे जरूर बसा.
छोटी परीक्षा आहे फक्त… थोडा जोर लावूयात… अटकेपार झेंडे फडकवूयात.
BEST OF LUCK