Shravan Somwar 2023: आज, २१ ऑगस्ट २०२३ हा यंदाचा पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे.
Shravan Somwar 2023: आज, २१ ऑगस्ट २०२३ हा यंदाचा पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात धार्मिक महत्त्व आहे. हा महिना अतिशय पवित्र मानला जात असून तो शंकराला समर्पित आहे.
या महिन्यातच भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्रा अवस्थेत जातात. तेव्हा महादेव या सृष्टीचे चक्र चालवतात, असं म्हटलं जातं. असे मानले जाते की जे लोक श्रावण सोमवारी उपवास करतात, भगवान शिव त्यांना सुख, आरोग्य, संपत्ती आणि इच्छित इच्छा पूर्ण करतात.
महादेव श्रीशंकर हे भोलेनाथ म्हणून ओळखले जातात त्यामुळे मोठमोठ्या भेटी, नेवैद्य यापेक्षा भक्तांनी पवित्र मनाने केलेला मंत्रजप सुद्धा त्यांना प्रसन्न करू शकतो. श्रावणी सोमवारी विशेषतः कोणत्या मंत्रांचा जप करायला हवा हे पाहूया, तसेच आज कोणती शिवामूठ वाहिली जाणार हे सुद्धा जाणून घेऊया…
हे ही वाचा : – Surgeries now free : १८ वर्षांपर्यंतच्या सर्वच, बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत!!
श्रावणी सोमवार २०२३: पहिली शिवामूठ
पहिली शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्याची प्रथा आहे. पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची शिवामूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।‘ हा मंत्र म्हणावा. प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहताना “शिवा शिवा महादेवा.. माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, “ असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी.
हे ही वाचा: – aadhar-npcl : तुमचे आधार-NPCI लिंक नसल्यास, तुम्ही ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही!!
श्रावणी सोमवारी करावा हा मंत्रजाप
ओम त्रयंभकम जजमहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम् उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर मुखिया ममृतात्..!!
कर्पूर गौरम करुणावतारम् संसारसारम् भुजगाईंद्र हरम सदा वसंतम् हृदय अरविंदे भवम भवानी साहित्यम् नमामि..!!
ओम नमः शिवाय..!!
तुम्हाला हे माहित आहे का?
‘सोमवार’ हा शब्द संस्कृत शब्द ‘सोम’ म्हणजे चंद्र या हिंदू देवता चंद्रापासून आला आहे आणि भगवान शिव त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र धारण करतात म्हणून भगवान शिव ‘सोमेश्वर’ म्हणून ओळखले जातात. श्रावणातील सोमवाराला सुद्धा यामुळेच विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.