shishak bharti 2024shishak bharti 2024

shishak bharti 2024 : शिक्षक भरती मध्ये ६०% वाला नियम गोपनीय, गुणवत्ता असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वर अन्याय

📌 गुणवत्ता असून हजारो मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वर शिक्षक भरती मध्ये पूर्व सूचना न दिल्याने अन्याय झाला आहे

📌 जो निर्णय आहे तो निवडयादी लागल्यानंतर कळविण्यात आला की ओपन प्रवर्गावर निवड होण्यासाठी ओपन प्रवर्गातून tet/ctet पास असणे आवश्यक आहे, हाच निर्णय आयुक्त यांनी स्वप्रमाणित अर्ज करत असताना सांगितला नाही

📌 प्राधान्य क्रम जनरेट झाल्यानंतर देखील आयुक्त सूरज मांढरे यांनी हा निर्णय गोपनीय ठेवला

वारंवार सांगितले जात होते की पात्रतेनुसार प्रेफरन्स येत आहेत तर मग, ओपन चे preferences आलेले होते ती आपली पात्रता होती.. ६० टक्के वाला नियम होता तर निव्वळ ओपन ची preference दिलेच कशाला हा गंभीर प्रश्न आहे

📌 मागासवर्गीय उमेदवार यांच्याकडे खुल्या प्रवर्गातून पास असणारे प्रमाणपत्र होते तेच जोडले तरच तुमची निवड खुल्या प्रवर्गातून होईल याबाबत पूर्वसूचना का दिल्या नाहीत.

📌 रात्री अपरात्री बुलेटिन काढून निर्णय कळविले जातात तर tet/ctet बाबत निर्णय का कळविला नाही

📌 tet/ctet खुल्या प्रवर्गातून पात्र असाल तर निवड खुल्या प्रवर्गावर होते याबाबतचा निर्णय निवडयादी लावल्यानंतर का कळविण्यात आला

📌 जास्त मार्क असून हजारो विद्यार्थी यांना स्व जिल्हा न मिळता दुसऱ्या जिल्हात जावं लागलं

📌 प्राधान्य क्रम मागासवर्गीय उमेदवार *tet/ctet) यांना खुल्या गटाचे पसंदी क्रम देण्यासाठी त्यांच्या लॉगिनला त्या जाहिराती देण्यामागे कारण काय?

📌 पसंदी क्रम देते वेळी ,कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी हा निर्णय का कळविला नाही?रात्री ,मध्यरात्री बुलेटिन येते या सूचना का दिल्या नाहीत

📌 ६० टक्के वाला निर्णय गोपनीय ठेवण्याचे कारण काय?

चूक झाली मान्य करा,

हि बाब मला अन्यायकारक वाटत आहे..
तरीपण तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की 60% अट रद्द करून लावलेल्या अंतिम निकालाच्या याद्या revise करून पुन्हा लावाव्या… ही विनंती…

समाजासाठी… लढू शकत नसाल तर बोला, बोलू शकत नसाल तर लिहा, लिहू शकत नसाल तर साथ द्या ,मात्र साथ देखील देता येत नसेल तर, जे लढत आहेत लिहीत आहेत ,बोलत आहेत त्यांचे मनोबल वाढवा, कारण ते तुमच्या हिश्याची लढाई लढत आहेत

माननीय आयुक्त साहेबांचे उत्तर येथे पहा क्लिक करा

tc
x