shishak bharati : शिक्षक भरती मध्ये स्टेप बाय स्टेप अन्याय कसा झाला
शिक्षक भरतीत मागास प्रवर्ग चे आरक्षण कसे चोरले जाते
१. 2017 ला मागास वर्गीय 50 टक्के जागा कपात केली. आणि खुल्या प्रवर्गला जागा करून दिल्या.
२. 2024 ला विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग ला जागा नाहीत. वेळोवेळी पाठपुरावा केला पण आयुक्त सूरज मांढरे ने लक्ष दिले नाही.
३. उलट विशेष बैठका घेवून खुल्या प्रवर्ग ला जागा वाढवल्या. आता त्या कोणाच्या कपात करून दिल्या?
४. भटक्या विमुक्तांच्या जागा सर्व जिल्ह्यात अतिरिक्त दाखवल्या.
५. टीईटी/ CTET मध्ये ६० टक्के ची अन्याय कारक अट याद्या जाहीर करण्याच्या 1 तास आधी सांगून पुन्हा मागास वर्गावर अन्याय केला.
६. 2017 च्या मागास उमेदवारांना अजून न्याय मिळाला नाही.
७. ज्या उद्देशाने पवित्र प्रणाली सुरू केल्या, त्या खाजगी संस्थांना पोर्टल वर आणलेच नाही.
८. एका संस्थेत १:३ ऐवजी १० उमेदवार पाठवल्यास घोडेबाजार रंगणार. ज्याने जास्त पैसे दिले, त्यालाच मुलाखती मध्ये उत्तीर्ण करून नोकरी दिली जाईल.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणतात,
आम्ही २१ हजार पदांची शिक्षक भरती केली
१. त्यात सर्वाधिक उमेदवार कोणत्या जातीचे भरले?
२. अभि योग्यता परीक्षेत जास्त गुण मिळवणाऱ्या गुणवत्ता धारक उमेदवारांना बेरोजगार ठेवून कमी गुण असणाऱ्यांची भरती का केली.?
३. प्रामाणिक उमेदवारांवर नेहमी अन्याय करून न्यायालयात जाण्यास भाग का पाडले. ?
४. 2022 ची भरती 2024 अर्धा झाला तरी पूर्ण का झाली नाही?
५. धनगर समाजाने वारंवार काटेकोर बिंदू नामावली तपासण्या संदर्भात निवेदने दिली. तरी बिंदू नामावली फक्त सह्या करून वर पाठवली. निवड प्रवर्ग न बघता सेवा पुस्तिका बघून बिंदू का ठरवले?
६. मागास वर्गावर अन्याय करून गुणवत्ता धारकांना बेरोजगार ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर अट्रासिटी दाखल करण्यास का दिरंगाई होत आहे.?
७. आताच्या सरकारला जातीयवादी का म्हणायचे नाही?
मागासवर्गीयांना मागास ठेवणाऱ्या रोस्टर घोटाळ्याचे खरे सत्य.! येथे क्लिक करा