shikshak bharti 2024 : मा. आयुक्त साहेब नमस्कार,
सध्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती होत आहे.ही प्रक्रिया शासन धोरण प्रमाणे चालू आसेल व योग्य प्रकारे चालू आहे.
पण काल जी निवड यादी लागली त्यात प्रत्येक zp ने इंग्रजी माध्यम शिक्षक मागणी केली होती.परंतु किती इंग्रजी माध्यम शिक्षक भरली गेली . अत्यंत कमी याचे उदाहरण म्हणजे सोलापूर zp प्रशासन यांनी मागणी केली 91 इंग्रजी माध्यम शिक्षक व 1 शिक्षक इंग्रजी माध्यम शिक्षक भरला गेला .प्रशासन यांनी योग्य भरती केली आसेल.व कॉमन रोस्टर मुळे हे झाले असेल पण प्रत्येक zp मध्ये इंग्रजी माध्यम शिक्षक मागणी केली आहे.त्याऐवजी खूपच कमी निवड झाली आहे.
आता प्रशासन म्हणते .आम्हाला पुढील 25 वर्षांचे विद्यार्थी यांना शिक्षण देण्याचे नियोजन करायचे आहे.
या अगोदर पण महाराष्ट्रात सेमी शाळा सुरू करण्यात आल्या .आता तर पालकांची मागणी सेमी व इंग्रजी माध्यम शिक्षण देण्याकडे आहे.
आता शासनाने शासकीय zp शाळा सेमी शाळा केल्या .या अगोदर केल्या.त्या बंद करण्याची वेळ आली कारण इंग्रजी माध्यम शिक्षण घेतलेले शिक्षक उपलब्ध नाहीत. शासनाने 2013 साली शासन नियम आला सेमी शाळेवर एक इंग्रजी शिक्षक असावा .व विद्यार्थी यांना zp शाळेमध्ये सेमिचे शिक्षण देणे सुरू केले
आजपर्यंत ज्या सेमी शाळा सुरू आहेत .त्या ठिकाणी इंग्रजी माध्यम शिक्षक उपलब्ध नाहीत.आणि यापुढे ही ती उपलब्ध नसणार .कारण काल जी निवड यादी लागली .खूप कमी शिक्षक इंग्रजी माध्यमाची निवड झाली.
यात .कोणाला नोकरी लागली हे महत्वाचे नाही पण शासनाने ज्या सेमी शाळा सुरू केल्या त्या प्रत्येक सेमी शाळेवर इंग्रजी माध्यम शिक्षक मिळणार गरजेचे आहे.
व विद्यार्थी यांचा विचार करता सेमी शाळा शिक्षण हे भविष्यासाठी गरजेचे आहे.पण शासन 2013 पासून नियम आसुन सुद्धा शिक्षक उपलब्ध करू शकत नाही तर या सेमी शाळा सुरू ठेवणे कितपत योग्य आहे.हे प्रशासन विचार करेल.प्रशासन सेमी शाळा बंद पण करेल पण आज पालकांची मागणी बघता व भविष्याचा विचार करता बंद करणे शक्य नाही.याउलट सेमी शाळा आणखी वाढ होईल.
पण आज त्या शाळेवर इंग्रजी माध्यम शिक्षक नाही व आपण त्या मुलांना शिक्षण देतो. सध्या भरती चालू आहे. यापुढे ही भरती चालू राहील . असे भरती प्रक्रिया टप्पे सुरू राहतील पण शासन नियमानुसार जर प्रत्येक सेमी शाळेवर एक इंग्रजी माध्यम शिक्षक उपलब्ध करू शकत नाही का .या कॉमन रोस्टर मुळे ही पदे रिक्त राहतील .कारण मराठी माध्यम मुले खूप जास्त आहेत .व इंग्रजी माध्यम मुले कमी आहेत.
यात कॉमन रोस्टर मुले या इंग्रजी माध्यम शिक्षक जागा प्रत्येक टप्प्यात खूपच कमी भरली जाणार.
यात शासनाने नव्याने सेमी शाळेवर इंग्रजी माध्यम शिक्षक मागणी केली.ती कॉमन रोस्टर मुळे रिक्त राहिली .जर मागणी सेमिची नसती केली तर ज्या जागा मराठी मिडीयम मुलांना गेल्या असत्या तर त्यात त्या जागा रिक्त तरी राहिल्या नसत्या.
आणि सेमी इंग्रजी माध्यम शिक्षक मागणी केली आहे तर ती भरली जाणे गरजेचे होते
कारण 2013 शासन नियमानुसार प्रत्येक सेमी शाळेवर एक इंग्रजी माध्यम शिक्षक प्रशासन कसे भरणार हा महत्वाचा प्रश्न आहे.
या अगोदर शासनाने 20%आरक्षण ठेवले .त्यानुसार मागील भरती मध्ये काही इंग्रजी माध्यम शिक्षक भरली गेली .
मग शासन जी 20%इंग्रजी माध्यम शिक्षक हा नियम आहे .फक्त किती घ्यायची हे स्वातंत्र्य आहे .त्यात 20%हे मर्यादा नाहीं मग या नियमानुसार किंवा सेमी शाळेवर इंग्रजी माध्यम शिक्षक असावा या नियमानुसार इंग्रजी माध्यम शिक्षक वेगळ्या मेरिट पण शासन भरू शकत नाही का….
जर शासन मागणी इंग्रजी माध्यम शिक्षक करू शकते.ते पण नियमाप्रमाणे पण रिक्त जागा राहतात.त्यापेक्षा इंग्रजी माध्यम मुलांना या भरती मध्ये काही प्रमाणत टक्केवारी दिली असती तर आज प्रत्येक सेमी शाळेवर एक इंग्रजी माध्यम शिक्षक उपलब्ध झाले आसते.याउलट .प्रत्येक zp ने मागणी केली इंग्रजी माध्यम शिक्षक मिळवा व झाले काय ती पदे भरली गेली नाहीत.
आम्ही इंग्रजी माध्यम शिक्षक भरती मध्ये लागणार हे महत्वाचे नाही.शासन आता या सेमीशाळा सुरू ठेवणार व तिथे इंग्रजी माध्यम शिक्षक नाही.हे कितपत योग्य आहे. आणि प्रशासन पुढील भरती कितीही टप्पे केले तरी सेमी शाळेवर कॉमन रोस्टर मुळे शिक्षक मिळणार नाहीत .यदाकदाचित ती खूप कमी मिळतील .
आता तर विध्यार्थी यांचे खूपच नुकसान झाले .एक तर मागणी नुसार सेमी शाळेवर इंग्रजी माध्यम शिक्षक मिळाला नाही.व त्या जागा मराठी माध्यम मुलांना दिल्या असत्या तर ती तर मराठी माध्यम मुले लागली आसती.
प्रशासनाने वेगळी इंग्रजी माध्यम शिक्षक मागणी केली.पण याउलट ती पदे रिक्त राहिली. याउलट ही पदे मराठी माध्यम यांना जरी दिली असती तरी .त्यात काही प्रमाणत लागली असती.मग ही वेगळी मागणी करून काहीच उपयोग नाही झाला याउलट पदे रिक्त राहिली.व सेमी शाळेवर पण इंग्रजी माध्यम शिक्षक मिळाला नाही.
तरी यापुढे प्रशासन सेमीच्या शाळेवर इंग्रजी माध्यम शिक्षक नेमणूक करण्यात काही प्रमाणात इंग्रजी माध्यम मुलांना काही टक्के जागा राखीव ठेवाव्यात .किंवा सेमी शाळेवर एक शिक्षक कसा भरला जावा .याचे नियोजन करणे गरजचे आहे का ?प्रशासन यात काय करणार नाहीतर सेमी शाळा शिक्षक इंग्रजी माध्यम नसल्यामुळेबंद करण्याची आज नाहीतर उद्या वेळ येणार .आता तर आपण भरती पूर्ण करीत आहोत .शेवटी विद्यार्थी हित बघणे गरजचे आहे.
साहेब आपण याच्यावर योग्य निर्णय घ्याल व विद्यार्थी यांना भविष्यवेधी व गरजेनुसार शिक्षण मिळेल.धन्यवाद साहेब
सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल : येथे क्लिक करा