Senior citizen : तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि तुमची मुलं-सून तुमची काळजी घेत नाहीत का? तुम्हाला एकटे आणि उपेक्षित वाटत आहे का?
चिंता करू नका! तुमच्यासाठी मदत उपलब्ध आहे. तुम्ही 14567 वर एल्डर लाइन क्रमांकावर कॉल करून मदत मिळवू शकता.
एल्डर लाइन हे 24/7 उपलब्ध असलेले टोल-फ्री क्रमांक आहे जे देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना मदत पुरवते. एल्डर लाइन तुम्हाला खालील गोष्टींमध्ये मदत करू शकते
ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पण, अलीकडे म्हातारे आईवडील मुलांना ओझे वाटू लागले असून, मुलगा-सून सांभाळत नाहीत. त्यामुळे उतारवयात त्यांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच, ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुद्धा चालविली जाते.
हाडाची काडे करून ज्या आईवडिलांनी मुलांना शिकवले, नोकरीला लावले. काहीजणांना उद्योग-व्यवसायासाठीही मदत केली. पण, तीच मुले मोठी झाल्यानंतर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घरातून हाकलून देत असल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. शहर व ग्रामीण परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिकांना घरगुती समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा संकटसमयी त्यांना मदतीची गरज असते. पण, कोणीही त्यांना मदतीचा हात देण्यासाठी धजावत नाही. दुसरीकडे स्वत:च्या मुलांविषयी तक्रार करण्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक धजावत नसून आपल्यावर होत असलेला अन्याय सहन करतात. पण, काहीजण मात्र आपल्या होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.
मदतीसाठी हेल्पलाईन <<< येथे क्लिक करा >>>
This post was last modified on %s = human-readable time difference 7:43 am