X

SBI BANK : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI मध्ये १५११ पदांची बंपर भरती; कुठे कसा करावा अर्ज? जाणून घ्या

SBI BANK

SBI BANK : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँके (एसबीआय) ने देशभरातील वेगवेगळ्या शाखांसाठी स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरतीची घोषणा केली आहे. डिप्टी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर अशा 1511 पदांवर भरती केली जाणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असणार आहे.

पदसंख्येचा तपशील

  1. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – प्रोजेक्ट मॅनेजमेंट- 187 पदे
  2. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – इंफ्रा सपोर्ट आणि क्लाउड ऑपरेशन – 412 पदे
  3. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) – 80
  4. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) आयटी – आर्किटेक्ट – 27
  5. डिप्टी मॅनेजर (सिस्टम) इन्फॉर्मेशन सेक्युरिटी – 7
  6. असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) – 784
  7. बॅकलॉग व्हॅकंसी- असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) – 14

वयोमर्यादा

  • पहिल्या पाच प्रकारच्या पदांसाठी – 25-35 वर्षे.
  • सहाव्या आणि सातव्या प्रकारच्या पदांसाठी – 21-30 वर्षे.

निवड कशी केली जाईल

  • असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) – ऑनलाइन लेखी परीक्षा आणि इंचरॅक्शन.
  • इतर सर्व पदांसाठी – शॉर्टलिस्टिंग-कम-टायर्ड/लेयर्ड इंटपॅक्शन
    प्रोबेशन
  • निवडलेल्या उमेदवारांना पहिल्यांदा एका वर्षाच्या प्रोबेशन कालावधीवर ठेवण्यात येईल. या कालावधीत त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल. बँकेच्या स्टँरर्डनुसार सेवा आढळल्यास, त्यांची सेवा स्पेशालिस्ट कॅडर अंतर्गत निश्चित केली जाईल.

यांना बॉन्ड भरावा लागेल

  • असिस्टंट मॅनेजर (सिस्टम) ग्रेड – JMGS-I हे पद असेल. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना जॉईन होताना 2 लाख रुपयांचा बाँड भरावा लागेल. याअंतर्गत किमान पाच वर्षे बँकेत काम करणे बंधनकारक असेल.

अर्ज शुल्क

  • सामान्य/EWS/OBC साठी अर्ज फी रु.750/- आहे.
  • SC/ST/PWBD साठी कोणतेही शुल्क नाही.

मूळ जाहिरात वाचा : https://shorturl.at/4af6Q

ऑनलाइन अर्ज करा :

  • sbi.co.in
  • bank.sbi/web/careers/current-openings

हेही वाचा : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज!!
हेही वाचा : मोठी बातमी ग्रामपंचायतीला बाय-बाय क्लिक करा आणि कागदपत्रे मिळवा.

हेही वाचा : शिक्षक व्हायचंय?; शेवटची मुदत…

This post was last modified on %s = human-readable time difference 12:08 pm

Tags: SBI BANK
Davandi: