X

SBI Alert: जर तुम्ही PAN अपडेट केले नाही तर बंद होणार खाते? जाणून घ्या व्हायरल Fake Message

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया वर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर एसबीआय खातेधारकांनी त्यांच्या योनो खात्यात त्यांचा पॅन क्रमांक अपडेट केला नाही, तर हे योनो खाते ब्लॉक केले जाईल.

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

एसबीआयच्या योनो मोबाइल बँकिंग अॅपचा वापर गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. ग्राहक घरबसल्या या अॅपच्या मदतीने अनेक व्यवहार करू शकतात. मात्र आता चोरट्यांनी याच अॅपच्या मदतीने लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर एसबीआय खातेधारकांनी त्यांच्या योनो खात्यात त्यांचा पॅन क्रमांक अपडेट केला नाही, तर हे योनो खाते ब्लॉक केले जाईल. यासोबतच एक लिंकही पाठवली जात आहे, ज्यामध्ये त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे पॅन कार्ड काही मिनिटांत अपडेट करू शकता, असे सांगण्यात येत आहे.

तुम्हालाही हा मेसेज आला असेल तर या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. नुकतेच PIB Fact Check ने या संदेशाची सत्यता तपासली असून, हा संदेश खोटा असल्याचे समोर आले आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 8:47 am

Davandi: