
santosh deshmikh case
Santosh Deshmukh Case : बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर परळी शहर आणि बीडमधील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांबाबत संशयाचे ढग निर्माण झाले होते. या पोलीस अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्याशी हितसंबंध असून या माध्यमातून संबंधित पोलीस कर्मचारी अनेक वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याचे आरोप झाले होते.
तसेच यापैकी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रचंड आर्थिक माया जमवल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. यापैकी परळी पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे (Bhaskar Kendre) यांच्यावरील आरोप सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले होते.
भास्कर केंद्रे यांच्या मालकीचे 100 टिप्पर आणि 15 जेसीबी असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर भास्कर केंद्रे यांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे.
भास्कर केंद्रे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळतानाची मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ‘डिजिटल दवंडी’ या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.