
Santosh Deshmukh Beed
Santosh Deshmukh Beed : मस्साजोग गावात गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख प्रकरणामुळे वातावरण तापले होते. या प्रकरणाने गावकऱ्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण केल्या होत्या. मात्र, सणाच्या दिवशी ग्रामस्थांनी एकजूट दाखवत मोठा निर्णय घेतला आहे.
Santosh Deshmukh Beed : गावातील प्रमुख नागरिक आणि पंचायतीच्या बैठकीत सर्वांनी एकत्र येऊन चर्चा केली. गावकऱ्यांनी आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी सहकार्य करण्याचा निर्धार केला.
Santosh Deshmukh Beed : संपूर्ण पार्श्वभूमीवर मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आज अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यात गावात कोणताही सण साजरा झालेला नाही.
आज परंपरेने साजरी होणारी होळी देखील या ठिकाणच्या ग्रामस्थांनी साजरी केलेली नाही. जोवर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत गावात कोणताही सण साजरा करण्यात येणार नसल्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतलेला आहे.
त्यामुळे कोणताही आनंदोत्सव गावात साजरा होणार नसल्याचं सांगितलं आहे. कुटुंबात सूतक हे 10 दिवसांचं असतं मात्र ज्या दिवशी आरोपींना शिक्षा होईल त्याच दिवशी आमचं सूतक संपेल, असं यावेळी बोलताना गावकऱ्यांनी सांगितलं आहे.