SAMVAD APP : केंद्र सरकारची मोठी घोषणा ! – आता व्हॉट्सअॅप ऐवजी वापरता येणार ‘संवाद’ अॅप
व्हॉट्सअॅप हे सध्या जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. मात्र, भारतात आता व्हॉट्सअॅपला टक्कर देण्यासाठी केंद्र सरकारने स्वतःचे मेसेजिंग अॅप विकसित केले आहे.
‘Samvad’ असे या अॅपचे नाव असून, या अॅपने नुकतीच सिक्युरिटी चाचणी पास केली आहे. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स’ ने या अॅपची निर्मिती केली आहे.
SAMVAD APP :पहा कसे असणार हे अँप
‘Samvad’ अॅपने सिक्युरिटी टेस्टमध्ये Test Assurance Level 4 क्लिअर केली आहे. हे अॅप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर लाँच केले जाऊ शकते.
टेस्ट पास झाल्याची माहिती DRDO ने आपल्या एक्स हँडलवरून दिली आहे. या अॅपला अद्याप लाँच करण्यात आले नाही. मात्र, याचे वेब व्हर्जन अॅक्सेस करता येऊ शकते.
CDoT या वेबसाईटवर जाऊन तुम्ही याचे वेब व्हर्जन वापरू शकता, असे DRDO ने म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपला देणार टक्कर ?