विद्यार्थ्यांनी असे करावेत अर्ज…
- विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी सुरवातीला ‘बार्टी’च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा.
- ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांसह तो प्रस्ताव ऑफलाइन पद्धतीने सात रस्ता येथील समितीच्या कार्यालयात द्यावा.
- विद्यार्थ्यांनी स्वतःचा अचूक मोबाईल क्रमांक व ई-मेल ॲड्रेस अर्जासोबत द्यावा, जेणेकरून अर्जाच्या त्रुटींची माहिती त्यावर समजू शकेल.
- परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेल्या विद्यार्थ्यांची ‘व्हॅलिडिटी’ त्याच्या ई-मेलवर ऑनलाइन पद्धतीने देखील पाठविली जाईल.
महत्त्वाचे..!
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावेत. प्रमाणपत्र देण्याचा कालावधी जरी ४५ ते ६० दिवसांचा असला, तरीदेखील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कोणतीही अडचण येणार नाही, यादृष्टीने त्यांच्या अर्जांवर दररोज कार्यवाही केली जात आहे. विद्यार्थ्यांनी योग्य पुराव्यानिशी ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करावेत, त्रुटी असल्यास त्याची तातडीने पूर्तता करावी.
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..