शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त
आरक्षण तसेच विषयानुसार उमेदवार अनुपलब्ध
पुणे, ता. २६ : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी शैक्षणिक संस्थांमधील २१ हजार ६७८ रिक्त पदांसाठी पहिल्या टप्प्यातील जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ रिक्त पदांवरील भरतीची कार्यवाही करण्यात आली. त्यातील ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून निवडीची शिफारस करण्यात आली आहे. विविध आरक्षणात आणि विषयानुसार शिक्षक उपलब्ध न झाल्याने उर्वरित हजारो जागा मात्र रिक्त आहेत.
पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पाच हजार ७१७ पदांसाठी अद्याप शिफारस झालेली नाही. माजी सैनिक, अंशकालीन आणि खेळाडू या कोट्यांसाठी आरक्षित असणाऱ्या जागांवर उमेदवार नसल्यामुळे या जागा रिक्त आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी इंग्रजी, मराठी, उर्दू
माध्यमातील आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी गणित-विज्ञान या विषयांसाठी शिक्षक उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत.
संबंधित रिक्त जागांवर उमेदवार
उपलब्ध न झाल्याने पहिल्या फेरीमध्ये
समांतर आरक्षणातील उमेदवार
उपलब्ध न झाल्यास भरतीच्या शेवटी दुसऱ्या फेरी घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार मुलाखतीशिवाय रिक्त जागा भरल्या जातील, असे शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.