रेशन कार्ड हरवलय,नो टेन्शन…! घरबसल्या काढुन घ्या

कोण करू शकते रेशन कार्डसाठी अर्ज?

✔️भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते.
✔️१८ वर्षांखालील मुलांचे नाव पालक रेशन कार्डमध्ये समाविष्ट करू शकतात.
✔️तसेच १८ वर्षांपुढील व्यक्ती वेगळ्या रेशन कार्डसाठी अर्ज करू शकते.

असा करू शकता ऑनलाइन अर्ज

● रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in वर जावून अर्ज करू शकतात.

● यानंतर Apply online for ration card या पर्यायावर क्लिक करा.

● रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्राइव्हिंग लायसन्स इत्यादी देऊ शकता.

● रेशन कार्डसाठी तुमच्याकडून ५ रुपयांपासून ते ४५ रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाईल. अर्ज भरल्यानंतर शुक्ल भरून सबमिट करा.

● फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्याचे आढळल्यास रेशन कार्ड मिळेल.

कोणते कागदपत्र आवश्यक

▪️ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ▪️हेल्थ कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स)
▪️पॅन कार्ड
▪️पासपोर्ट साइज फोटो
▪️उत्पन्नाचा दाखला
▪️पत्त्याचा पुरावा (वीजेचे बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमें अथवा पासबुक, भाडेकरार)

अर्जाचे स्टेट्स असे तपासा

● रेशन कार्डसाठी अर्ज केल्यावर तुम्ही घरबसल्यास अर्जाची स्थिती ट्रॅक करू शकता. यासाठी डिपार्टमेंट ऑफ फूडच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

● त्यानंतर Citizen Corner सेक्शनवर क्लिक करा.

● आता Track Food Security Application वर क्लिक करा.

● यातील चार पर्यायांपैकी एक भरा. आता तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता.

tc
x