मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरताना आपल्याला अनेक अडचणी येत असतील किंवा अनेक प्रश्न पडत असतील. त्यातीलच 35 प्रश्नांची उत्तरे खाली दिली आहे. सविस्तर वाचा…
१) फॉर्म भरताना डॉक्युमेंट साईज 5MB पेक्षा कमी असावी
२) नारीशक्ती ॲप चालत नसेल तर सकाळी लवकर उठून फॉर्म भरा लगेच सबमिट होतो, लाखो जन फॉर्म भरत आहेत त्यामुळे असा प्रॉब्लेम होणार
३) काही जणांनी अगोदर फॉर्म भरले आहेत तर त्यांनी पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही
४) फॉर्म भरताना नवीन हमीपत्र दिले आहेत ते आता इथून पुढे अपलोड करा. 👉🏻 https://drive.google.com/file/d/1dTd9ArjSwaojwWYRULu-uX28P4iZlV4W/view?usp=drivesdk
५) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर पहिलं पेज आणि शेवटचे पेज असे दोन्ही फोटो एकत्र करून अपलोड करा
६) अर्जदाराचा पत्ता म्हणजे आत्ता जिथे महिला राहत आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे
७) आता फक्त तुम्हाला आधार कार्ड वरील पत्ता पूर्ण टाकायचा आहे ॲप अपडेट करा
८) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखलाच अपलोड करावा लागेल
९) ऑनलाईन सगळा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कुठेही जमा करायची गरज नाही
१०) जॉईंट खाते चालत नाही सिंगल खाते अपलोड करा
११) पोस्टाचे अकाउंट लोड करत असाल तर फक्त ippb चे अकाउंट चालते
१२) अगोदरचा फॉर्म चुकला असेल तर तो आता दुरुस्त होणार नाही दुरुस्तीसाठी काही प्रक्रिया आली तर यूट्यूबवर व्हिडिओ पहा
१३) शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्माचा दाखला हा अगोदरच्याच नावाने असणार आहे त्यामध्ये काही बदल होणार नाही त्यामुळे तो अपलोड केला तरी चालतो फक्त पंधरा वर्ष चा अगोदर असावा
१४) रेशन कार्ड अपलोड करत असाल तर रेशन कार्ड वर महिलेचे नाव असणे गरजेचे आहे, आणि रेशन कार्ड 15 वर्ष पूर्वीचे जुने असावे
१५) बँक अकाउंट कोणतेही टाका काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डीबीटी मार्फत येणार आहेत म्हणजेच तुमचे आधार कार्ड च्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे आधार कार्ड ला बँक लिंक असणे गरजेचे आहे
१६) सर्व कागदपत्रांवरती नाव, जन्मतारीख सारखी असावी म्हणजे तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही
१७) आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणत्याही डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर दोन्ही साईड अपलोड करा
१८) सर्व फॉर्म इंग्रजी भाषेत भरावा कारण बँकेचे डिटेल्स आपले इंग्रजी भाषेत असतात त्यामुळे काही प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही
१९) फॉर्म भरायची ऑनलाईन कुठलीही वेबसाईट नाही फक्त नारीशक्ती दूत ॲप मधूनच फॉर्म भरू शकता
२०) ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी फॉर्मची प्रिंट काढून अंगणवाडी सेविकाकडे जाऊन फॉर्म भरावा
२१) डोमासाईल नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे कोणतेही एक डॉक्युमेंट असावे- रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, तरच तुम्ही फॉर्म भरू शकता नाहीतर नाही
२२) फॉर्म भरल्यानंतर कोणतीही पावती येत नाही तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून तुम्ही तुमचे स्टेटस चेक करू शकता
२३) फक्त अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरण्यासाठी सरकार 50 रुपये देणार आहे, याचा जीआर मध्ये उल्लेख आहे
२४) फॉर्म मध्ये काही चुका झाल्या असतील किंवा काही भरायचं राहिला असेल तर आता फॉर्म दुरुस्तीला आल्यानंतर त्यामध्ये बदल करता येईल आता काही करू शकत नाही
२५) पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर उत्पन्नाचा दाखला हा कुटुंब प्रमुखाचा अपलोड करावा तहसीलदाराचा दाखवा असावा
२६) बँक पासबुक अपलोड केले नाही तरी चालेल कारण पैसे आधार डीबीटीने येणार आहेत त्यामुळे ॲप वरती upload करणे मेंदेटरी नाही
२७) महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल तर तुम्ही दुसरे राज्य आता जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करू शकता त्यासाठी ॲप अपडेट करा
२८) फोटो काढल्यावर उजव्या साईडला रेड क्रॉस येत आहे, तर तो काढलेला फोटो कट करण्यासाठी आहे, त्यावर क्लिक केले की पुन्हा नवीन फोटो काढू शकता
२९) उत्पन्नाचा दाखला अपलोड करनार असेल तर 2024 25 असावा
३०) जन्म दाखला जर कोणी आत्ता काढला असेल तर अपलोड करू शकता
३१) डॉक्युमेंट्स ओरिजनल असतील तर त्याचा फोटो काढून अपलोड करा किंवा झेरॉक्स चा फोटो अपलोड केला तरी चालेल
३२) पाच नंबर आणि सहा नंबरचे कागदपत्र अपलोड करायला अनिवार्य नाही ( पासबुक आणि पतीचे कागदपत्र)
३३) संजय गांधी योजनेची पेन्शन मिळत असेल किंवा पीएम किसान योजनेची पैसे मिळत असेल किंवा अन्य कोणतीही योजनेचे पैसे मिळत असेल, हे पैसे 1500 किंवा 1500 पेक्षा जास्त असेल तर फॉर्म भरता येणार नाही
३४) हमीपत्र प्रिंट काढून घ्या त्यावरती पेनाने सर्व माहिती लिहा सर्व बॉक्स वर खुणा करा आणि आपले नाव टाकून सही करा दिनांक व ठिकाण टाका
३५) एका कुटुंबात फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित मुलगी अर्ज करू शकते बाकी महिलांना कुटुंबात लाभ मिळणार नाही
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..