6. महिलांना तीन सिलेंडर मोफत
ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर असेल त्यांना वर्षामध्ये तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
7. मुख्यमंत्री अँप्रेंटिसशीप योजना
मुख्यमंत्री अँप्रेंटिसशीप योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरूणांना प्रशिक्षण कालावधीमध्ये महिन्याला 10 हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त तरूणांना कशा प्रकारे काम देता येईल याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांच्यासाठी राज्य सरकारच्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून 10 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
8. दवाखाना आपल्या दारी
राज्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकारने दवाखाना आपल्या दारी ही योजना सुरू केली आहे. त्या माध्यामातून आतापर्यंत 1667 गावांमध्ये जवळवास 60 हजाराहून जास्त कँपचे आयोजन करण्यात आहे. त्या माध्यमातून 2.67 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. या योजनेसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
9. मुख्यमंत्री आरोग्य कक्ष, चॅरिटी बेड्सची सोय
मुख्यमंत्री आरोग्य कक्षाच्या माध्यमातून राज्यातील ट्रस्टच्या रुग्णालयांमध्ये चॅरिटी बेड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चॅरिटी बेड्सच्या माध्यमातून गरिबांना ट्रस्ट हॉस्पिटल्सच्या माध्यमातून मोफत ऑपरेशन्स करण्यात येतात. त्यामध्ये अगदी एक लाखापासून ते 60 लाखांपर्यंते ऑपरेशन करण्यात आले आहे.
10. महात्मा फुले जनारोग्य योजना
राज्यातील 12 कोटी जनतेकरता महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत करण्यात आला आहे. या आधी दीड लाख रूपयांपर्यंतचा उपचार मिळायचा. आता पाच लाखांपर्यंतचा उपचार देण्यात येतोय. या योजनेमध्ये रुग्णालयांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात येत आहे.