*️⃣ त्यांना तुम्ही अभ्यासक्रमाबद्दल आणि कॉलेजमधल्या वातावरणाबद्दल पुरेसे प्रश्न विचारून माहिती जमवली आहे का ?
*️⃣ तुम्ही जो अभ्यासक्रम निवडला आहे त्याची मूलभूत माहिती तुम्हाला आहे का ? उदा. तुम्ही जर मासकॉम ला प्रवेश घेत असाल तर टेलिव्हीजन आणि चित्रपट यांच्याबद्दलचे पुरेसे शिक्षण तुम्हाला त्या कॉलेजमध्ये मिळणार आहे का ?
*️⃣ मिळणारे शिक्षण व्यावसायिक पातळीवर उपयुक्त ठरणारे आहे की फक्त पुस्तकी आहे ? ही माहिती तुम्हाला इंटरनेटवरुन सहज मिळू शकते.
*️⃣ अभ्यासक्रमात काय काय आणि कुठल्या पद्धतीने शिकवले जाते हे तपासले तर तुम्ही शिक्षणाच्या दर्जाबद्दल अंदाज लावू शकता.
*️⃣ कॉलेजचं गुळगुळीत ब्रोशर आणि चकचकीत कपड्यातला स्टाफ या गोष्टींवर चुकूनही भाळू नका. या गोष्टी व्यवहार ज्ञान शिकवू शकत नाहीत.त्यासाठी चांगले शिक्षण आणि चांगल्या सोयीसुविधा असणं आत्यंतिक आवश्यक असतं.
*️⃣ तुम्ही निवडलेल्या कॉलेजमध्ये वैयक्तिक पातळीवर किती लक्ष दिले जाते, किती ‘स्कोप’ दिला जातो याचीही चौकशी करा. ही चौकशी तुम्ही थेट कॉलेजमध्ये जाऊनही करू शकता. अशावेळी तुमच्या प्रश्नांची तुम्हाला योग्य उत्तरं मिळाली तर ते कॉलेज तुमच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे असं समजायला हरकत नाही.
*️⃣ अनेकदा ॲडमिशन मिळाल्याच्या आनंदात, घाईगडबडीत बारीक सारीक माहिती गोळा करण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. पण त्याचे अनेकदा दुष्परिणाम कॉलेज सुरू झाल्यानंतर भोगावे लागू शकतात. त्यामुळे प्रवेशाची घाई न करता आधी सर्व माहिती गोळा करा.
*️⃣ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नुसते पुस्तकी रट्टे कॉलेजात मारले जातात की प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण मिळतं हे तपासा.
*️⃣ खात्री झाली की मगच प्रवेश घ्या. वर्ष वाया जाऊ नये म्हणून मिळेल तिथे प्रवेश घ्यायचा, दामदुप्पट फी भरायची आणि डोक्याचे घडे रिकामेच ठेवायचे असं करू नका.
*️⃣ अत्यंत सामान्य वाटणारे हे वरील प्रश्न स्वत:ला विचारा, उत्तरं तुमची तुम्हालाच सापडतील.