काय आहे अँप ?
अँपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघाती मदतीची सुविधा दिली आहे.
असे करा डाऊनलोड
प्ले स्टोअरवर ‘एमएसआरटीसी कॉम्प्युटर अॅप उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप प्रवाशांना वापरता येईल. वापरास अॅप सोपे आहे.
अपघात झाल्यास मदत मिळणार
महिलांना १०० किंवा १०३ क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा तसेच अपघात झाल्याची माहिती, वैद्यकीय मदतही प्रवाशांना अॅपद्वारे मागवता येणार आहे.
बस कुठे आहे हे आधीच कळणार?
बसेसना व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) बसविली आहे. याद्वारे बसचे लोकेशन, वेळापत्रक या सर्वांची माहिती प्रवाशांना मिळेल.
अभिप्राय, तक्रारी नोंदविण्याची सोय
▪️एसटी प्रवाशांना ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधा आहे.
▪️तक्रारींमध्ये ‘वाहक-चालक’, ‘बसस्थिती’, ‘बससेवा’, ‘ड्रायव्हिंग’, ‘मोबाइल अॅप’ असे वर्गीकरण केले आहे.
▪️तक्रारदारास मोबाइल, वाहन क्रमांक नोंदवावा लागेल.