ई-केवायसी झालेली आहे की नाही, हे कसं तपासणार?
सर्वांत अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे अॅप डाऊनलोड कर
डाऊनलोड लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.onenationonecard
त्यानंतर अॅप चालू करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल.
आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा.
त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे
त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल.
ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल.
ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अतिशय महत्वाचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून आपण योजनेचा लाभ घेण्यास सक्षम होऊ शकता.