April 7, 2025

आर्थिक अडचण हमखास होईल दूर…!

  1. किसान क्रेडिट कार्ड
    किसान क्रेडिट कार्ड ही योजना 1998 सालापासून अस्तित्वात असून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत दिले जाते. आतापर्यं या योजनेचा लाभ जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.
  2. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
    पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेकऱ्याला अर्ज करता येतो. सहा हजार रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना तीट टप्प्यांत मिळते. प्रत्येक चार महिन्यांला ही मदत शेतकऱ्यांना दिली जाते. अधिकृत संकेतस्थळावर जाऊनही या योजनेसाठी अर्ज करता येतो.