रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेने संमत केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ दोन दिवसांपुर्वीच राज्य सरकारकडे परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी हे विधेयक परत पाठवले. यामुळे झारखंड सरकार आणि राज्यपाल असा संघर्ष दिसून आला.
Ramesh Bais: आपल्याला माहीत असणे आवश्यक कोण आहेत रमेश बैस
रमेश बैस सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापुर्वी २०१९ मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम केले होते. सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.
Ramesh Bais: नगरसेवक- ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास
- 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक
- 1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य
- 1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री
- 1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला
- छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. ते सात वेळा खासदार झाले.
- मार्च 1998-ऑक्टोबर 1999 पोलाद आणि खाण राज्यमंत्री
- ऑक्टोबर 1999-सप्टेंबर 2000 रासायनिक खते राज्यमंत्री
- सप्टेंबर 2000-जानेवारी 2003 माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
- जानेवारी 2003-जानेवारी 2004 खाण मंत्रालय
- जानेवारी 2004-मे 2004 पर्यावरण आणि वन मंत्रालय
- 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल
- 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.