X

Rain update : ग्रीन अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट अन् रेड ‘या’ अलर्टचा अर्थ काय होतो? जाणून घ्या.

अनेकांना प्रश्न पडला असेल की ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्टचा अर्थ काय? याबद्दल माहिती जाणून घेऊयात…

🟢 ग्रीन अलर्ट : ग्रीन अलर्टचा अर्थ कोणतीही वॉर्निंग नाही. म्हणजे कोणतेही संकट नाही, सर्व काही ठिक आहे.

🟡 येलो अलर्ट : येलो अलर्ट म्हणजेच हवामानामध्ये होणाऱ्या बदलांकडे ‘लक्ष ठेवा’, ‘अपडेटेड रहा’.

🟠 ऑरेंज अलर्ट : नैसर्गिक आपत्तीसाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून ऑरेंज अलर्ट दिला जातो. तसेच लोकांना सावध करण्यासाठी हा अलर्ट दिला जातो.

🔴 रेड अलर्ट : रेड अलर्ट म्हणजे ‘चेतावनी’. हवामाना संदर्भातील अतिधोकादायक परिस्थिती ओढावते, तेव्हा रेड अलर्ट देण्यात येतो.