अनेकांना प्रश्न पडला असेल की ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्टचा अर्थ काय? याबद्दल माहिती जाणून घेऊयात…
🟢 ग्रीन अलर्ट : ग्रीन अलर्टचा अर्थ कोणतीही वॉर्निंग नाही. म्हणजे कोणतेही संकट नाही, सर्व काही ठिक आहे.
🟡 येलो अलर्ट : येलो अलर्ट म्हणजेच हवामानामध्ये होणाऱ्या बदलांकडे ‘लक्ष ठेवा’, ‘अपडेटेड रहा’.
🟠 ऑरेंज अलर्ट : नैसर्गिक आपत्तीसाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून ऑरेंज अलर्ट दिला जातो. तसेच लोकांना सावध करण्यासाठी हा अलर्ट दिला जातो.
🔴 रेड अलर्ट : रेड अलर्ट म्हणजे ‘चेतावनी’. हवामाना संदर्भातील अतिधोकादायक परिस्थिती ओढावते, तेव्हा रेड अलर्ट देण्यात येतो.