X

२०२४-२०२५ : अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे

युवा कार्य प्रशिक्षण योजना
युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ घोषित करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी १० लाख युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीला महिन्याला १० हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल.

शेतकऱ्यांना वीजबिल माफ
शेतकऱ्यांच्या वीजबिल माफीचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री सौर कृषी सौर वाहिनी योजना-२ राबवणार. शेतकऱ्यांना २४ तास वीज देण्यासाठी मोठा प्रकल्प हाती घेणार.

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किमीचे रस्ते बांधणार. संजय गांधी निराधार योजनेत ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता १५०० रुपये मिळणार. वेंगुर्ल्यात पाणबुडी प्रकल्प उभारण्यासाठी निधी देणार. माळशेज घाटात मुव्हिंग गॅलरी उभारणार. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जाहीर.