‘ही’ कागदपत्रे काढावीच लागतील

‘ही’ कागदपत्रे काढावीच लागतील

  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र (एक किंवा तीन वर्षाचे)
  • अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल)
  • राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र
  • ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (मुदत एक वर्ष असते)
  • एसईबीसी (कुणबी नोंद न सापडलेल्यांसाठी)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (मुदत तीन वर्षे असते)
  • केंद्र शासन जात प्रमाणपत्र (मुदत एक वर्षाची असते)
  • भूमिहीन किंवा शेतमजूर प्रमाणपत्र
  • अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
  • शेतकरी प्रमाणपत्र
  • एसईसी (कायम रहिवासी प्रमाणपत्र) व रहिवासी प्रमाणपत्र ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज वेळेत करा अन्‌ प्रमाणपत्र वेळेत मिळवा
    इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी जात प्रमाणपत्राची पडताळणी वेळेत करून घ्यावी. त्यासाठी जात पडताळणी समितीकडे ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परिपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव समितीकडे सादर करावा. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेळेत प्रमाणपत्र मिळेल. प्रमाणपत्र देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत असते, पण विद्यार्थ्यांना प्रवेशास कोणतीही अडचण येणार नाहीत, त्या दृष्टीने प्रमाणपत्र दिले जाते. ‘येथे’ करा जात पडताळणीसाठी अर्ज

  • व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे ऑनलाइन अर्ज करावा लागतो. शासनाच्या https://www.barti.com किंवा https://ccvis.com या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची सुविधा आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधिताने समितीला ऑफलाइन प्रस्ताव देखील देणे अपेक्षित आहे.

🙏🏻 कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

tc
x