वृश्चिक , धनु , मकर ,कुंभ , मीन

वृश्चिक (Scorpio Zodiac)
नवीन करिअर निवडण्यासाठी उत्तम काळ. तुम्ही जे शिकला आहात त्यातच तुमचे करिअर होताना दिसत आहे. तसेच भरपूर पैसा, पद आणि प्रसिद्धी मिळतील. यावर्षी कामानिमित्त परदेशवाऱ्या वाढतील, ज्याचा कालावधी ३ महिने ते १ वर्षापर्यंत राहील. नव्या ठिकाणी नव्या कामांचा अनुभव तुम्हाला सर्व दृष्टीने समृद्ध करेल. तुम्ही आनंदी राहील

धनु (Sagittarius Zodiac)
हे वर्ष आयुष्यात जणूकाही जादूची कांडी फिरावी इतके सुंदर जाणार आहे. हात घालाल त्यात यश मिळवाल पण ते यश सांघिक असेल हे विसरू नका त्या संधी चा फायदा घ्या . आर्थिक आणि भावनिक स्थैर्य मिळेल. घरात आणि कामाच्या ठिकाणी खेळीमेळीचे वातावरण असेल. आवडत्या विषयांवर भरपूर वाचन होईल. मैत्रिणींबरोबर सहलीला जाल. मिळणाऱ्या यशाने हुरळून जाउ नका. कामाच्या ठिकाणी सर्वांना सांभाळून घेत पुढे जाल. कोणत्या कामाची घाई करू नका

मकर (Capricorn Zodiac)
हा काळ खडतर आणि परिश्रमाचा आहे. पूर्ण वर्षभर तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे. बुद्धी आणि परिश्रम यांची सुंदर सांगड घाला. घरात मात्र फार वेळ देता येणार आहे- तिथे तणावाचे वातावरण राहील. यातच किशोरवयीन मुलांचे प्रश्न समोर उभे राहतील. संयमपूर्वक आणि शांततेने ते सोडवा. त्रागा करून घेऊन तुमचीच तब्येत बिघडेल. पैसा समाधानकारक मिळेल. त्यामुळे नाराज राहू नका

कुंभ (Aquarius Zodiac)
तुम्ही कामावर अत्यंत फोकस्ड आहेत. कामाची व्याप्ती वेगाने वाढत आहे. नवनवीन यशाची शिखरे गाठताना गुणवत्तेचाही विचार होत आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. कलाक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती विशेष चमकतील. वकील, डॉक्टर यांच्या करता हा काळ भरभराटीचा असेल. तुमच्यातील विशेष चुणुकीमुळे तुम्ही सगळ्यांच्या लक्षात राहाल. यश आणि पैसा भरपूर मिळेल . योग्य वापर करा

मीन (Pisces Zodiac)
कोणतेही काम हातात घेताना त्याची व्यवस्थित माहिती करून घ्या. अर्धवट माहिती आणि अतिउत्साह ह्यांच्यामुळे कामाचे नियोजन आणि गुणवत्ता दोन्ही चुकण्याची शक्यता आहे. मित्र आणि शत्रू ह्यांच्यातील फरक ओळखा. आपली भिस्त दुसऱ्यावर ठेऊन कामे करण्याचा मोह टाळा नाहीतर संकटात सापडाल. आर्थिक बाजू ठीक-ठीक राहील.

tc
x