वडिलांच्या मालमत्तेवर विवाहित मुलीचा किती अधिकार आहे?

वडिलांच्या मालमत्तेवर विवाहित मुलीचा किती अधिकार आहे?


विवाहित मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकते का? तर उत्तर होय, विवाहित स्त्री वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकते. हिंदू उत्तराधिकार कायदा, १९५६ मध्ये २००५ मध्ये झालेल्या दुरुस्तीनंतर मुलीला सहवारस मानले गेले आहे. आता मुलीच्या लग्नाने वडिलांच्या मालमत्तेवरील तिचा हक्क बदलत नाही. म्हणजे लग्नानंतरही वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क असतो. यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलाइतकाच मुलीचा ही हक्क आहे.

मुलगी दावा कधी करू शकत नाही?


लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे वडिलांनी मृत्यूपूर्वी आपली मालमत्ता मुलाच्या नावावर केली तर. अशा परिस्थितीत मुलगी वडिलांच्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. स्व-अर्जित मालमत्तेच्या बाबतीतही मुलीची बाजू कमकुवत असते. वडिलांनी स्वत:च्या पैशातून जमीन विकत घेतली असेल, घर बांधले असेल किंवा विकत घेतले असेल तर ही मालमत्ता तो ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो.

स्वत:ची मालमत्ता आपल्या मर्जीने कोणालाही देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे. म्हणजे वडिलांनी मुलीला आपल्या मालमत्तेत वाटा देण्यास नकार दिला तर मुलगी काहीकरू शकत नाही.

काय म्हणतो भारताचा कायदा


मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान वाटा मिळण्याचा कायदेशीर अधिकार देण्यासाठी हिंदू वारसा कायदा १९५६ मध्ये २००५ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. मालमत्तेवरील दावे व हक्कांच्या तरतुदीसाठी १९५६ मध्ये हा कायदा करण्यात आला. यानुसार वडिलांच्या मालमत्तेवर मुलाइतकाच मुलीचा ही हक्क आहे. २००५ मध्ये मुलींच्या हक्कांना बळकटी देणाऱ्या वारसा कायद्यातील दुरुस्तीमुळे वडिलांच्या मालमत्तेवरील मुलीच्या हक्काविषयी कोणत्याही प्रकारची शंका दूर झाली.

कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..

tc
x