X

रोगावर १००% उपचार.

रोगावर १००% उपचार.
📞 9834496760
पोस्टाने किवा कुरिअर ने Online औषध पाठवण्याची सोय.


कोडाच्या अनुवंशिकतेबद्दल समाजात असणारी भीती

कोडाच्या अनुवंशिकतेबद्दल समाजात भीती आहे. परंतु आजपर्यंत कोणतेही एक जनूक सापडलेले नाही. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कोड होईल किंवा नाही, हे सांगू शकणारी कोणतीही तपासणी उपलब्ध नाही. घरातील कोणालाही कोड नसले, तरी एखाद्या व्यक्तीला कोड होण्याची शक्यता सुमारे एक टक्का एवढी असते.

जवळच्या नातेवाईकास कोड असल्यास ही शक्यता चार ते पाच टक्के असते. कोड असलेल्या व्यक्तींपैकी सुमारे १५ ते २० टक्के व्यक्तींच्या नातेवाईकांमध्ये हा विकार आढळतो. मध्यम आणि उतारवयात येणाऱ्या पांढऱ्या डागांमध्ये मानसिक ताणतणाव, घटस्फोट, मृत्यूची भीती, मधुमेह किंवा थायरॉइडचे विकार ही कारणे असू शकतात.

‘कोड’ बाबतचे समज व गैरसमज

१. कोड संसर्गजन्य आहे का?

कोड हा आजार नाही तसेच संसर्गजन्यही नाही. संपर्काने, एकत्र राहिल्याने, जेवल्याने हा आजार पसरत नाही. कोड हा अ‍ॅटोइम्युन आजार आहे.

२. शरीरावरील प्रत्येक पांढरा डाग म्हणजे कोड?

शरीरावर विविध कारणांमुळे पांढरे डाग निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकवेळेस तो कोड असेलच असे नाही. काही वेळेस कुष्ठरोग, भाजल्याच्या जखमेनंतरही त्वचेवर पांढरे डाग पडतात.

३. विशिष्ट पदार्थांच्या सेवनाने कोड होतो का ?

मासे खाल्ल्यानंतर जल प्यायल्याने, आंबट किंवा पांढरे पदार्थ खाल्ल्याने कोड होतो असा समाजात गैरसमज आहे. मात्र कोणताही पदार्थ खाल्ल्याने कोड होत नाही.
कोड हा काही आजार नसून शरीरात रंगकणांची कमतरता आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नये.

🙏सहकार्य करा : हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा