X

भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला

वातावरणातील बदलामुळे होणारे ग्लोबल वॉर्मिंग आणि त्याचे इतर गोष्टींवर होणारे दुष्परिणाम हा सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम कृषी क्षेत्रावर होताना दिसत आहे.

या संदर्भात, APEC म्हणजेच आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने या वर्षीच्या पावसाचा अंदाज नुकताच वर्तवला आहे. त्यानुसार यंदा भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदाची बातमी असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

APEC नुसार, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत जागतिक स्तरावर कुठे आणि किती पाऊस पडेल? हवामान कसे असेल? याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. द हिंदूने भारतीय हवामान खात्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असेल.