X

बाळाच्या वाढीचे टप्पे व आहार

७ महिने :
या महिन्यात बाळ आधाराने बसू लागते. बाळ खेळणी उचलून हलविते व फेकू शकते. त्याचे नाव घेतल्यास प्रतीसाद देते. बाळ एकेक अक्षर बोलू लागते.

८ महिने :
या महिन्यात बाळ आधाराशिवाय बसू शकते व रांगण्याचा प्रयत्न करते. एका हातातून दुसऱ्या हातात खेळणे घेते. खेळणी तोंडात घालते. आपण बोललेली अक्षरे ते स्वतः बोलण्याचा प्रयत्न करते.

९ महिने :
बाळ रांगायला लागते. खेळण्यांची आवड दाखवणे. खेळणी हातात घेऊन त्याकडे पाहते, अक्षरे जोडून बोलू लागते. बाबा, काका, मामा, टाटा, दादा असे शब्द बोलू लागते.

१० महिने :
आधाराने उभे राहते. आनंदाने टाळ्या वाजविते. टाटा करणे, छोटी वाक्ये त्याला समजू लागतात.

११ महिने :
बसल्यावर आधाराशिवाय उठून उभे राहते व आधाराने पावले टाकते. खेळणी किंवा वस्तू पकडते, खेळण्यात रमते.

१२ महिने :
बाळ उठून उभे राहते व दुसऱ्यांचा हात धरून हळूहळू पावले टाकते. बाळाचे सहा दात येतात. त्याला आपण बोललेले समजू लागते. जन्माच्या वेळी असलेल्या वजनाच्या तिप्पट वजन यावेळी होते.

१३ महिने :
बाळ उठून उभे राहते व आधाराशिवाय चालण्याचा प्रयत्न करते. वस्तू उचलून घेते. छोटे शब्द बोलू लागते.

१४ महिने :
आधाराशिवाय चालू लागते. पायऱ्या रांगत चढू लागते. अनेक छोटे छोटे शब्द बोलू लागते.

१५ ते १७ महिने :
बाळ घरात खूप चालत राहते. त्याचे १० ते १२ दात येतात. खेळणी पाहिजे असतात. शब्दांची सारखी बडबड चालू असते.

१८ ते २४ महिने :
न धडपडता घरात खूप चालत असते, पळू लागते. खुर्चीवर बसू शकते. चेंडू फेकू शकते ग्लासने दूध किंवा पाणी पिऊ शकते. शब्दांची सारखी बडबड चालू असते.

२ वर्षे :
पायऱ्या चढू उतरू शकते. न पडता पळत असते, उड्या मारते. चेंडू फेकून खेळू शकते. स्वतःच्या हाताने खाऊ खाते. त्याला हवे ते मागत असते. पेन्सिलने वहिवर रेषा मारते, रंगीत चित्रे पाहण्यात दंग होते . लघवीला आल्याचे सांगते. वाक्ये बोलू लागते, आजूबाजूच्या वस्तूंची नावे सांगते.

३ वर्षे :
स्वत: कपडे घालते. दिवसभर खेळ चालूच असतो. घराच्या बाहेर खेळू लागते. बरो नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागते.

४ वर्षे :
खूपच समजू लागते. सारखे खेळायला आवडते. बरोबरीच्या मुलांमध्ये रमते. तीनचाकी सायकल चालवू लागते. वहीत चित्रे रंगवण्याचा, अक्षरे काढण्याचा प्रयत्न करते.

हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे केवळ सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि प्रत्येक मुल वेगळे असते. काही मुले इतरांपेक्षा लवकर विकसित होत असतात, तर काही मुले थोडे मागे असतात. आपल्या मुलाच्या वाढी आणि विकासाबद्दल आपल्याला काही प्रश्न किंवा चिंता असल्यास, आपल्या बालरोगतज्ञांशी बोला.

⊱━━━━✥⊰༺☬༒☬༻⊱✥━━━━⊱