पोलीस भरतीच्या या वेळापत्रकामधील हा बदल नवी मुंबई मध्ये होणाऱ्या भरतीबाबत घेण्यात आला आहे. कारण उमेदवारांना भरती देताना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. इतर ठिकाणी नियोजनाप्रमाणे भरती प्रक्रिया सुरू आहे.
17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून तब्बल 17 लाख 76 हजार 256 करण्यात आले आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरूणाईची संख्या अधिक आहे. डॉक्टर, वकील, एमबीए आणि बी.टेक केलेले उमेदवार पोलीस भरतीच्या प्रक्रियेत उतरले आहेत. तर राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे.