X

तर आरक्षित गटातील उमेदवार नियुक्तीस पात्र……

…तर आरक्षित गटातील उमेदवार नियुक्तीस पात्र

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आरक्षित गटातील

उमेदवारास खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळाले असतील तर खुल्या प्रवर्गातील जागा मिळण्यास आरक्षित गटातील उमेदवार पात्र असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च

आरक्षित गटातील दोन उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवारापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. त्यामुळे त्यांची खुल्या गटातील जागांवर नियुक्ती करावी, असा आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आरक्षित गटातील उमेदवारांचे गुण व गुणवत्ता यादीत स्थान जर उत्तम असेल तर ते खुल्या गटातील जागांवर आपली नियुक्ती व्हावी असा दावा करू शकतात, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एम. आर. शहा व न्या. बी. व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने दिला. याआधी इंद्रा सहानी विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात म्हणजेच मंडल आयोगाच्या खटल्यात

राजस्थान हायकोर्टाचा योग्य निर्णय

■ अशोककुमार यादव, दिनेशकुमार या दोन ओबीसी उमेदवारांना खुल्या गटातून नियुक्त केलेल्या उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळाले होते.

■त्यामुळे त्या दोघांची खुल्या गटामध्ये नियुक्ती व्हायला हवी हा राजस्थान उच्च न्यायालयाने दिलेला निकाल योग्य आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.

सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता, त्याचा दाखलाही या खंडपीठाने दिला.

अन्य मागासवर्गीय गटातल्या दोन उमेदवारांनी बीएसएनएलमध्ये खुल्या गटात आमची नियुक्ती करा, अशी मागणी केली होती. बीएसएनएलमध्ये टेक्निकल असिस्टंट या पदासाठी २००८ साली नोकरभरती झाली होती.