जनतेचा विश्वास मोदींवर- अमित शाहदरम्यान, आजच्या निकालानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”एनडीएचा हा विजय म्हणजे देशासाठी आयुष्य खपवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांच्या अढळ विश्वासाचे प्रतिबिंब आहे. मोदीजींच्या विकसित भारताच्या व्हिजनवर जनतेचा हा विश्वास आहे.
हा सार्वजनिक आशीर्वाद म्हणजे मोदीजींच्या गरीब कल्याण, वारशाचे पुनरुज्जीवन, महिलांचा स्वाभिमान आणि शेतकरी कल्याणाच्या कामाच्या यशाचा आशीर्वाद आहे. या जनादेशासह विकासाच्या प्रवासाला अधिक गती आणि बळ देण्यासाठी न्यू इंडिया तयार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएला सलग तिसऱ्यांदा देश सेवेची संधी दिल्याबद्दल मी देशातील जनतेला सलाम करतो. सलग तिसऱ्या विजयाने जनतेचा विश्वास फक्त मोदींवर असल्याचे स्पष्ट झाले आहे,” असे शाह म्हणाले,” असे शाह म्हणाले..
या राज्यांमध्ये भाजपचे नुकसान निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एनडीए 294 त्यापैकी एकटा भाजप 240 आहे. तर इंडिया आघाडी 232 जागांवर असून, काँग्रेसने 99 जागा आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 2019 च्या तुलनेत येथे भाजपच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे..