X

कॅशलेस सुविधा काय आहे?

कॅशलेस सुविधा काय आहे?
■ जर तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कॅशलेस सुविधेचा अर्थ असा आहे की जेव्हा आरोग्य विमा घेणारी व्यक्ती आजारी पडते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होते, तेव्हा विमा कंपनीकडून मिळालेल्या कार्डद्वारे तो हॉस्पिटलचा खर्च उचलतो.
■ त्याला स्वतःच्या खिशातून काहीही द्यावं लागत नाही. या सुविधेमुळे विमा कंपन्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर थेट हॉस्पिटलला पैसे देतात. यासाठी तुम्हाला पैशाची व्यवस्था करावी लागणार नाही.

क्लेमच्या सुविधेचा कसा लाभ घ्यावा?
● आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कॅशलेस क्लेम सुविधेचा लाभ घेण्यासाठी, विमाधारक व्यक्तीला विमा कंपनीच्या लिस्टेड रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात.
● रुग्णालय विमाधारकाने दिलेल्या तपशीलांची पडताळणी करेल आणि त्यांच्या विमा कंपनीला प्री ऑथोरायझेशन फॉर्म पाठवेल.
● विमा कंपनी प्री-ऑथोरायझेशन विनंतीची छाननी करेल आणि पॉलिसीच्या कव्हरेज आणि इतर तपशीलांबद्दल हॉस्पिटलला माहिती देईल.
● प्री ऑथोरायझेशन रिक्वेस्ट रिजेक्ट केल्यास उपचाराचा खर्च तुम्हाला करावा लागतो, नंतर त्याचं रिइम्बर्समेंट केलं जाऊ शकतं.
● प्री ऑथोरायझेशन रिक्वेस्ट मंजूर झाल्यास, उपचार सुरू होतील आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतर, अंतिम बिल आणि डिस्चार्ज पेपर्स विमा कंपनीकडे पाठवले जातील. देयके (लागू असल्यास) आणि खर्च वजा केल्यानंतर ते अंतिम रक्कम सेटल केली जाईल.

इमर्जन्सीत कॅशलेस नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की आपत्कालीन परिस्थितीत कॅशलेस सुविधा उपलब्ध नाही, यासाठी तुम्हाला रिइम्बर्समेंट करावं लागेल. कारण नेटवर्क हॉस्पीटल्समध्ये कॅशलेस क्लेमसाठी प्री ऑथोरायझेशन आवश्यक आहे. परंतु, आपत्कालीन परिस्थितीत यासाठी वेळ उपलब्ध नसतो.

🇯‌🇴‌🇮‌🇳‌ 🇳‌🇴‌🇼‌
https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj

👆🏻 ही माहिती तुमच्या कडील 🪀ग्रुप ला नक्की शेअर करा