X

किती कर्ज मिळते

किती कर्ज मिळते

ही योजना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती. तेव्हापासून या योजनेचा अनेकांनी लाभ घेतला आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना याचा लाभ मिळाला असून आणखी तीन कोटी महिलांना याचा लाभ पुरवला जाणार आहे. या अंतर्गत एक लाखांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.

विविध कौशल्याचे प्रशिक्षण देखील ही योजना पुरवते. या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज मिळते. म्हणजेच फक्त कर्जाची रक्कम महिलांना फेडावी लागते. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर व्याज आकारले जात नाही.

कशी असते प्रक्रिया

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागीय बचत गटाकडे नोंदणी करावी लागते. ज्या महिलांची विभागीय बचत गटाकडे नोंदणी असते त्यांनाच या अंतर्गत लाभ मिळतो. विभागीय बचत गटात जाऊन अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. या योजनेसाठी व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात. अर्ज केल्यानंतर अर्जाची पाहणी होते, अर्जाची पडताळणी पूर्ण केली जाते आणि यानंतर मग सदर लाभार्थी महिलेला या योजनेअंतर्गत कर्ज मिळते.

आवश्यक कागदपत्रे आणि पात्रता

या योजनेअंतर्गत देशभरातील महिला पात्र ठरतात. मात्र या योजनेचा लाभ महिला बचत गटात सदस्य असलेल्या महिलांनाच मिळतो. 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्न दाखला, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, एक फोटो अशी महत्त्वाची कागदपत्रे या योजनेच्या लाभासाठी आवश्यक असतात.