कर्क , सिंह ,कन्या , तूळ

कर्क (Cancer Zodiac)
ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्याबद्दल दुःख करत बसण्यात काहीच अर्थ नाही. सगळं झटकून कमला लागा. स्वतःवर विश्वास ठेवा. नव्या व्यक्ती आयुष्यात येणार आहेत. भूतकाळ विसरून वर्तमानात जगा. नवीन नोकरी-व्यवसाय करायचा असल्यास परिश्रम करायला लागतील. कामाच्या ठिकाणी सगळ्यांशी मिळून-मिसळून राहा. पैश्यांची काळजी नसावी, तो मिळत राहील. डोकेदुखी वर औषधोपचार वेळेतच करा.

सिंह (Leo Zodiac)
तुमच्यावर कामाचा ताण वाढतो आहे. लोकांच्या कामाचं ओझं स्वतःच्या डोक्यावर ओढवून घेऊ नका. त्याचा परिणाम तुमच्या तब्येतीवरच नाही तर कामावर सुद्धा होतोय. “मी बरा, माझं काम बरं” हा दृष्टिकोन ठेवा. कामात एकसुरीपणा आल्यामुळे कंटाळवाणे होत आहे. थोडा धीर धारा. आत्मपरीक्षणाची गरज आहे- कामातल्या चुका लक्षात येतील आणि यश मिळेल.

कन्या (Virgo Zodiac)
आतापर्यंत केलेल्या कामाचे चीज होणार आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे. वेळ घालवला तर नुकसान होईल. जुन्या गुंतवणुकीतून आणि आधी केलेल्या कामातून धनलाभ. कृतीशून्य होऊ नका- कामावर लक्ष केंद्रित करा. यश हाताशी आहे. घरात आणि कामात तुमचं दुर्लक्ष होत आहे. कंबरदुखीचा त्रास होईल. शारीरिक त्रासाकडे लक्ष्म द्या

तूळ (Libra Zodiac)
यावर्षी सगळीकडे समतोल राखणे गरजेचे आहे. अपेक्षित असलेले प्रमोशन वा बढती थोडी पुढे-मागे होईल, पण मिळेल नक्की. कामाच्या ताणामुळे तब्येत बिघडू देऊ नका. थोडीशी तगमग वाढली आहे कारण घर आणि काम दोन्हीकडे नव्या जबाबदाऱ्या अंगावर येऊन पडल्या आहेत. त्यासाठी शारीरिक आणि भावनिकरीत्या सक्षम होणे गरजेचे आहे. वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे हाताखालच्या व्यक्तींकडून गोड बोलून काम काढून घ्यावे लागेल. आर्थिक लाभ समाधानकारक राहील.

इथे पहा :- वृश्चिक , धनु , मकर ,कुंभ , मीन

tc
x