एजन्सीमध्ये केवायसीची सोय

एजन्सीमध्ये केवायसीची सोय

गॅस सिलिंडरधारकांनी एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी. त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रीडिंग किंवा थम्ब, हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवायसी झालेल्या ग्राहकांची माहिती कंपन्यांकडे उपलब्ध असून अनेक कोर्डधारकांची केवायसी अजून बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

एकाच नावावरचे कनेक्शन होणार रद्द

ग्राहकांना एजन्सी कार्यालयात जाऊन केवायसी करता येणार आहे. यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता; परंतु आता केवायसीसाठी कडक निर्बंध लावल्याने केवायसी शिवाय ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. याशिवाय एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर असेलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.

tc
x