इंटर्नशिप योजना म्हणजे नक्की काय?

इंटर्नशिप योजना म्हणजे नक्की काय?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार, इंटर्नशिप योजनेंतर्गत देशातील 500 आघाडीच्या कंपन्यांमध्ये एक कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल. या योजनेअंतर्गत, मासिक भत्त्यासह, प्रशिक्षणार्थींना एकरकमी सहाय्य (प्रोत्साहन) देखील दिले जाईल.

या इंटर्नशिप योजनेचा देशातील एक कोटी तरुणांना फायदा होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. योजनेनुसार तरुणांना मासिक 5,000 रुपये भत्ता दिला जाईल. याशिवाय इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण करणाऱ्या तरुणांना 6,000 रुपयांची वेगळी प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. योजनेचा पहिला टप्पा दोन वर्षांसाठी आहे; दुसरा टप्पा तीन वर्षांसाठी असणार आहे.

कंपन्यांना प्रशिक्षण खर्चाबाबत अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात असे म्हटले आहे की, तरुणांसाठी प्रशिक्षण आणि इंटर्नशिपच्या खर्चाच्या 10 टक्के रक्कम कंपन्यांना उचलावी लागणार आहे.

यासाठीच्या अर्जांवर ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रक्रिया केली जाईल; ज्यांची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. इंटर्नशिपच्या संधी देणाऱ्या कंपन्यांना व्यावहारिक कामाचा अनुभव आणि कौशल्य विकास सत्रे आवश्यक असतील.

तरुणांनी इंटर्नशिप दरम्यान किमान अर्धा वेळ कार्यालयीन काम करणे अपेक्षित आहे; जेणेकरून त्यांना एकूण नोकरीचे वातावरण कसे आहे हे कळू शकेल.

tc
x