आता १७ मे पर्यंत द्यावा लागणार अर्ज
ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्ह्यात अर्ज केले आहेत, त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे. एकापेक्षा जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियमबाह्य ठरवण्यात येणार आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पोलिस कार्यालयात १७ मे २०२४ पर्यंत हे हमीपत्र देणे आवश्यक आहे.
आता उमेदवाराच्या केवळ एकाच अर्जाला प्राधान्य दिले जाईल. हमीपत्रात उमेदवाराने कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा तपशील द्यावा लागणार आहे. तसेच त्याने किती अर्ज केले आहेत आणि ते कुठे कुठे केले ही माहिती द्यावी लागणार आहे. तसेच एका पदासाठी केवळ एका अर्जालाच प्राधान्य देण्याची हमी त्यास द्यावी लागणार आहे.
भरतीसाठी डॉक्टर, एमबीए उमेदवारांचे अर्ज
पोलीस भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए, वकील, एमएस्सी, बी-टेक, बीबीएचे शिक्षण घेतलेले उच्चशिक्षितांचे अर्ज आले आहेत. 17 हजार 471 पदांसाठी राज्यभरातून 17 लाख 76 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सरकारी नोकरी आणि बेरोजगारीमुळे हे अर्ज केले आहेत.
🇯🇴🇮🇳 🇳🇴🇼
https://chat.whatsapp.com/DNAqWuHUf77JxQyX215Xoj
ही माहिती तुमच्या कडील ग्रुप ला नक्की शेअर करा