अनिवासी भारतीयांसाठी नियम काय

अनिवासी भारतीयांसाठी नियम काय

  • NRI किंवा भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना देशभरात मालमत्ता खरेदीचा अधिकार असून यासाठी त्यांना कोणत्याही विभागाच्या विशेष परवानगीची गरज नाही. तसेच भारतीय वंशाच्या परदेशी नागरीकांना शेतजमीन, कोणतीही बाग किंवा फार्म हाऊस वगळता भारतात केवळ निवासीच नव्हे तर व्यावसायिक मालमत्ताही खरेदी करण्याचा अधिकार आहे. म्हणजे अनिवासी भारतीय निवासी किंवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करू शकतात ज्यासाठी त्यांना वैयक्तिक ओळखपत्र आणि पॅन कार्ड यांसारख्या सामान्य व्यक्तीसाठी विहित केलेल्या कागदपत्रांसह पासपोर्टसारखी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असते. अनिवासी भारतीय भारतात राहणाऱ्या भारतीय रहिवाशासोबत संयुक्तपणे मालमत्ता खरेदी करू शकतो.

भागीदारीतही मालमत्ता खरेदी करता येते

  • दोन भागीदारी कंपन्यांना मालमत्ता खरेदी करायची असेल तर बहुतेक कागदपत्रे वैयक्तिक मालमत्तेसारखीच असतात. यामध्ये खरेदीदाराला भागीदारी करारासह भागीदारी फर्मच्या अधिकृतता पत्राची प्रत सादर करावी लागेल. तसेच भागीदारीच्या फर्मने जीएसटी क्रमांकासह पॅनकार्ड क्रमांकासह सादर करणे आवश्यक असून इथेही मालकी म्हणून घेतल्या जाणाऱ्या मालमत्तेत थर्ड पार्टी पेमेंटला वाव नाही.
tc
x