हवामान खात्याने यापूर्वी दिलेल्या इशाऱ्यात राज्यात ९ एप्रिलपर्यंतच पाऊस पडेल, असे सांगण्यात आले होते. मात्र, हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यात 10 ते 13 एप्रिलदरम्यान 13 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा दिला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत कमाल तापमानात घट झाली आहे. तीन दिवसांपूर्वीपर्यंत विदर्भात कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवले गेले होते. तापमानाचा पारा चढताना दिसत असतानाच, अवकाळी पावसामुळे पारा 40 अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे.
राज्याच्या इतर भागात म्हणजे पुण्यात १५ आणि १७ एप्रिल असे दोन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई आणि कोकणातील वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज आहे. राज्यातील इतर प्रमुख शहरे ढगाळ राहतील आणि विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अनेक ठिकाणी लाल, केशरी आणि पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.